लातूर : प्रतिनिधी
लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष अंगद वाघमारे यांनी दि. ७ ते १४ डिसेंबर या कालावधीत लातूर जिल्हाधिकारी कार्यालयसमोर मातंग समाजाच्या विविध विकासाच्या मागण्यासाठी बेमुदत उपोषणा सुरु केले होत. त्याचवेळी नागपुर येथे हिवाळी अधिवेशन सुरु होत. या उपोषणाची माहिती माजी मंत्री आमदार आमित विलासराव देशमुख यांना मिळताच त्यांनी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करुन मातंग समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारला धारेवर धरले होते. त्याबद्दल मातंग समाजाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
मातंग समाजाच्या विविध विकासाच्या मागण्या मान्य होण्यासाठी सरकारकडे प्रश्न उपस्थित केल्याबद्दल माजी मंत्री आमदार आमित देशमुख यांचे मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने बाभळगाव येथे भेट घेऊन आभार मानले. या प्रसंगी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अॅड. किरण जाधव, लहुजी सेना संस्थापक अध्यक्ष अंगद वाघमारे, प्रा. नागनाथ डोंगरे, अप्पासाहेब देडे, अशोक देडे, विकास कांबळे, जी. ए. गायकवाड, सुरेश चव्हाण, पिराजी साठे, संपतं गायकवाड, नारायण कांबळे, सुनिल बसपुरे, श्रावण मस्के आदी कार्यकर्ते उपस्थित होते.