22.1 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रमाती,पाणी अन्नाचे शत्रु ठरतायेत: विकास दांगट

माती,पाणी अन्नाचे शत्रु ठरतायेत: विकास दांगट

एमआयटी एडीटी’त जागतिक अन्न दिन साजरा

पुणे : प्रतिनिधी
शेतीप्रधान भारतातील शेतक-यांनी पारंपारिक शेती आता मागे सोडली आहे. हरित क्रांतीनंतर देशातील अन्नधान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली असली तरी शेतक-यांकडून किटकनाशके व रसायनांच्या वाढलेल्या वापरामुळे मातीची सुपिकता खालावली आहे. मानवी हस्तक्षेपामुळे भूजलातील पाणी देखील प्रदुषित होत आहे. ज्याचा परिणाम रोजच्या खान्यातील अन्नाच्या दर्जावर होतो. ज्यामुळे, सध्या माती व पाणी हे अन्नाचा दर्जा खालाविण्यासाठी मुळ शत्रु ठरत आहेत, असे मत एसव्ही ग्रुपचे चेअरमन व उद्योजक विकास दांगट यांनी मांडले.

ते येथे एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्­नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या स्कुल ऑफ फुड टेक्नॉलॉजीतर्फे जागतिक अन्न दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

या प्रसंगी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डॉ.सुनिता कराड, इन विरो केअर लॅबचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.निलेश अमृतकर, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, प्रभारी प्राचार्य डॉ.अंजली भोईटे, डॉ.संगिता फुंडे, डॉ.सुजाता घोडके, डॉ.अशोक तोडमल, डॉ.रिंकू अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ.भोईटे यांनी तर आभार डॉ. सुजाता घोडके यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR