26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमनोरंजनमाधुरी दीक्षितने घेतली ‘फेरारी’

माधुरी दीक्षितने घेतली ‘फेरारी’

मुंबई : वृत्तसंस्था
अभिनेत्री माधुरी दीक्षित ‘धक् धक् गर्ल’ म्हणून लोकप्रिय आहे. ९० च्या दशकात तिच्या अदाकारीने तिने सर्वांनाच घायाळ केलं. लग्नानंतर माधुरी अनेक वर्षे अमेरिकेत स्थायिक होती. मात्र आता ती कुटुंबासोबत मुंबईतच असून पुन्हा सिनेसृष्टीत सक्रिय झाली आहे. आज मकर संक्रांतीच्या मुहुर्तावर माधुरीने लक्झरी कार खरेदी केली आहे.

माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी नुकतीच फेरारी २९६ जीटीएस खरेदी केली आहे. याची किंमत तब्बल ६ कोटी रुपये आहे. काल १३ जानेवारी रोजी दोघेही लाल रंगाच्या फेरारीमध्ये दिसले. त्यांची फेरारी बघून लोक दंग झाले. पापाराझींनी त्यांना कॅमे-यात कॅप्चर केले. माधुरी शिमरी गाऊनमध्ये दिसली तर डॉ. नेनेंनी काळ्या रंगाचा सूट घातला होता. इन्स्टाग्रामवर हा व्हीडीओ जोरदार व्हायरल होतोय.

माधुरीकडे अगोदरच मर्सिडीज आहे, ज्याची किंमत २.५ कोटी रुपये आहे. याशिवाय मर्सिडीज एस क्लास, स्कोडा ऑक्टेविया व्हीआरएस, इनोव्हा क्रिस्टा, रेंज रोवर वोग या लक्झरी कारही आहेत. तसेच काही स्पोर्टस् कारही आहेत. डॉ. नेने कारचे शौकिन आहेत. ५७ वर्षीय माधुरीला २१ वर्षीय अरीन आणि १९ वर्षीय रायन दोन मुलं आहेत. माधुरी नुकतीच ‘भूल भुलैय्या ३’ मध्ये दिसली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR