32.5 C
Latur
Sunday, May 26, 2024
Homeलातूरमानवास सुख, समृध्दी लाभो, दु:ख नाहीसे व्हावे

मानवास सुख, समृध्दी लाभो, दु:ख नाहीसे व्हावे

औसा : प्रतिनिधी
ऐ अल्लाह, ‘हमारे मुल्क ंिहंदूस्थान की हिफाजत अता फर्मा’ व भारतातील सर्व नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे, सुख, समृद्धी लाभावी व दु:ख नाहीसे व्हावे, यासाठी औसा शहर काझी मीर मुज्जमील अली यांनी अल्लाहकडे दुआ (प्रार्थना) केली. तसेच लोकशाही मजबूत करण्यासाठी जनजागृती करीत आगामी होणा-या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावा, असे आवाहन करण्यात आले.
मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजानच्या तीस दिवसांचे उन्हाळ्यात आलेल्या उपवासा (रोजा) नंतर साजरा केली जाणारी ईद- ऊल – फित्र चा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहर काझीनी सर्वांसाठी अल्लाहकडे  दुआ (प्रार्थना) केली. शहरात प्रतिवर्षाप्रमाणे  दि. ११ एप्रिल २०२४ गुरुवारी मुस्लिम समाज बांधवांनी ‘रमजान ईद’ नमाज पठणाने  साजरा करण्यासाठी येथील किल्ला मैदान परिसरातून सकाळी ८ . ४५  वाजता रॅलीने निघून ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यासाठी ९ . ३० वाजता पोहचून औशाचे शहर काझी मीर मुज्जमीलअली काझी यांचे बयान (प्रवचन) झाले तर रमजान  ईदची ‘ईद-ऊल – फित्र ची नमाज इस्लाम धर्माचे मक्का- मदीना युनिव्हर्सिटीचे मीर हशमतअली काझी यांनी केली. यावेळी नमाज  पठण करण्यासाठी तालुक्यासह शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या संख्येने ईदगाह मैदानावर हजेरी लावली होती.
यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर औशाचे आमदार  अभिमन्यू पवार, औसा तहसीलदार भरत सुर्यवंशी,पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड, कॉग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमर खानापुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत सूर्यवंशी, भाजपचे  संतोष मुक्ता, सुनिल उटगे यांच्यासह विभागीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR