29.3 C
Latur
Sunday, April 21, 2024
Homeसोलापूरमारहाणीत तरूणाचा मृत्यू

मारहाणीत तरूणाचा मृत्यू

सोलापूर- दारू पिण्यासाठी सोबत न आल्याने करण्यात आलेल्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील राहुल गांधी झोपडपट्टीत घडली. याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान शब्बीर रायचुरवाले (वय ३२, रा. राहुल गांधी झोपडपट्टी, सोलापूर) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत शमशादबी इमरान रायचुरवाले (वय ३०) या महिलेच्या फिर्यादीवरुन रवि विठ्ठल कट्टीमनी (रा. राहुल गांधी झोपडपट्टी, सोलापूर) याच्याविरुध्द जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवि कट्टीमनी यास पोलिसांनी अटक केली आहे. इमरान रायचुरवाले व रवि कट्टीमनी हे एकमेकांचे शेजारी आहेत. रवि कट्टीमनी याने इमरान यास दारू पिण्यासाठी त्याच्यासोबत येण्याबाबत तगादा लावला होता. त्यावेळी इमरान हा कट्टीमनी याच्यासोबत जाण्यासाठी तयार नव्हता.

त्यावरून रवि कट्टीमनी याने इमरान यास शिवीगाळ करून  इमरान याच्या पोटात जोरदार लाथा मारल्या. त्यामुळे इमरान हा पाठीवर पडून त्याच्या डोक्याच्या मह्यागील बाजूस जबर मार लागल्याने तो बेशुध्द पडला. त्यामुळे इमरान यास बेशुध्दावस्थेत तात्काळ नातेवाईकांनी उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी उपचारादरम्यान डॉ. रामकृष्ण डोक यांनी इमरान यास मृत घोषित केले. दरम्यान, याबाबत मयत इमरान यांची पत्नी शमशादबी यांच्या फिर्यादीवरुन रवि कट्टीमनी याच्याविरुध्द जेलरोड पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कट्टीमनी यास अटक केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR