औसा : प्रतिनिधी
बेलकुंड येथील श्री संत शिरोमणी मारूती महाराज सहकारी साखर कारखानाचा सन २०२४-२५ च्या गळीत हंगामाचे मील रोलर पूजन राज्याचे माजी मंत्री सहकार तथा मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते बुधवारी आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार त्रंबक भिसे, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा संचालक यशवंतराव पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, जिल्हा कोंग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, जिल्हा बँकेचे माजी संचालक संभाजी सुळ, सचिन दाताळ, कारखान्याचे चेअरमन शामराव भोसले, व्हाइस चेअरमन सचिन पाटील, कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा संचालक अॅड.श्रीपतीराव काकडे, संचालक गणपतराव बाजुगळे संचालक अॅड बाबासाहेब गायकवाड, शामराव साळुंके, आमित माने, विलास काळे, सुभाष जाधव, संतोष भोसले, अनिल पाटील ,गोंिवद सोनटक्के, रमेश वळके, शिवाजी बिराजदार, चंद्रसेन पाटील, भरत माळी, कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे आदी मान्यवर उपस्थित होते.