29.9 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeसोलापूरमार्च एन्डपर्यंत १०० टक्के कामे पूर्ण करून शासन पातळीवरील सर्व निधी वापरणार —कार्यकारी अभियंता...

मार्च एन्डपर्यंत १०० टक्के कामे पूर्ण करून शासन पातळीवरील सर्व निधी वापरणार —कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी

सोलापूर-
जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक मधील असलेल्या ६ तालुक्यातील एकही फाईल माझ्याकडे पेंडिंग ठेवली नसल्याचा दावा कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी केला. दरम्यान, मार्च एन्डपर्यंत १०० टक्के कामे पूर्ण करून शासन पातळीवरील सर्व निधी वापरणार असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले.

जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम विभाग २ जबाबदारी असलेले कार्यकारी अभियंता कुलकर्णी पुढे म्हणाले की, माझ्याकडे मंगळवेढा, सांगोला, करमाळा, पंढरपूर, माळशिरस या ५ तालुक्यांच्या रस्ते कामाची जबाबदारी आहे. या तालुक्यांसाठी ३०/५४ या हेडखाली २० कोटीचा निधी आणि ५०/५४ हेडखाली (जिल्हा अंतर्गत रस्ते) १० कोटीचा असा एकूण ३० कोटीचा निधी मिळतो. या तालुक्यासाठी २०४ कामांचे नियोजन करण्यात आले होते. त्यामधील १३३ कामे पूर्ण केली आहेत. ४० कामे प्रगतीपथावर आहेत तर उर्वरित कामे मार्च एन्डपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तर ५०/५४ या हेडखालील (इतर जिल्ह्याला जोडणारे रस्ते) २४ कामे पूर्ण केली आहेत. तर ११ कामे प्रगतीपथावर आहेत. इतर कामांचाही गतीने पाठपुरावा सुरू आहे.

या व्यतिरिक्त जिल्ह्यातील नवीन शाळांचे बांधकाम ७७ ठिकाणी ठिकाणी, सुरू आहे. शाळा दुरूस्ती ३५ नवीन अंगणवाडी बांधकाम १२९, प्रा. आरोग्य वैद्यकीय केंद्र, उपकेंद्र दुरूस्ती ८३ व पशु दवाखान्यांची ७ ठिकाणी कामे सुरू असून, या टक्के कामांना प्रशासकीय मान्यता ९० मिळाली आहे. एकंदरीत, या कामांचा आमच्या , सहकार्यांना घेवून वेळेत निपटारा केला असून आगामी सन २०२३-२४ साठीही ३० कोटीचाच निधी मंजूर झाल्याचीही माहिती शेवटी कुलकर्णी यांनी दिली.

मी या विभागाचा वरिष्ठ असल्याने माझ्या अखत्यारितील ५ तालुक्यात चालू असलेल्या अशा विकासकामांच्या स्पॉट पाहणीसाठी वारंवार जाण्याचा प्रयत्न करतो. काम चालू असलेल्या ठिकाणी गेल्यावर कामाची गुणवत्ता तपासतो. सुचना केल्याने ठेकेदार अजून चांगल्या पध्दतीने काम करतात. लोकांनाही चांगल्या पध्दतीचे, टिकावू रस्ते मिळतात. यामुळे माझ्या कार्यालयातील काम सांभाळून साईट पाहणीसाठीही जाण्याचा नेहमी माझा प्रयत्न असतोच.असे जिल्हा परिषद, बांधकाम विभाग क्र. २ कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR