25.2 C
Latur
Thursday, June 13, 2024
Homeमहाराष्ट्रमावस बहिणींवर सामूहिक अत्याचार

मावस बहिणींवर सामूहिक अत्याचार

पुणे : प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील दोन अल्पवयीन मावस बहिणींवर चार जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.

सदर आरोपींनी मुलींवर अत्याचार केल्याचा व्हिडिओ काढून तो व्हिडिओ दुस-याला दिला व त्यांनी तो व्हिडिओ त्यातील एका अल्पवयीन मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.

या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह एकुण पाच जणांवर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईने पारगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात दोन अल्पवयीन सख्ख्या मावस बहिणी घरात एकट्या असताना अवधूत राजू पंचरास, कुणाल कैलास बो-हाडे , दोन अल्पवयीन मुले यांनी घरात घुसून दरवाजाला आतून कडी लावून, जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. तसेच सदर आरोपींनी मुलींवर केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून तो महेश सुभाष तांबे याला दिला होता. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे व पारगाव पोलीस करत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR