27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeनांदेडमी कोठून निवडणूक लढवणार हे पक्षश्रेष्ठी ठरवतील

मी कोठून निवडणूक लढवणार हे पक्षश्रेष्ठी ठरवतील

माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर

कंधार : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी सोडणार अशा बावड्या उठवल्या जात आहेत मी तसे कधी कुठे म्हटलं नाही अफवांवर विश्वास ठेऊ नका माझ्या हातात लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवायचं नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल, तो निर्णय मान्य करु, अस मी ठरवलं आहे. लोहा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी माझ्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. शेवटी कार्यकर्ता म्हणून नेतृत्वाच्या बाहेर जाता येत नाही असे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

कंधार येथील संपर्क कार्यालयात दि २ रोजी मंगळवारी कंधार दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी संवाद साधला यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव केंद्रे, भाजपाचे तालुकाध्यक्ष किशनराव डफडे, भाजपाचे तालुका सरचिटणीस मधुकर डांगे उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी खा. चिखलीकर म्हणाले की, लोकसभा निवडणूकीत मी पराभूत झालो असलो तरी सिडको भागातून मला खूप मतदान मिळाले आहे. त्यामुळे मला तिथल्या लोकांनी नांदेड दक्षिण मधून विधानसभा लढावी असे वाटते हा माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान आहे. कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची इच्छा कंधार -लोहा विधानसभा निवडणूक लढवावी. नांदेड जिल्ह्यातील कार्यकर्ते म्हणतात की नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाल्याने लढवावी. परंतु माझ्या हातात लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवायचं नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल, तो निर्णय मान्य करु, अस मी ठरवलं आहे. मी भाजप पक्षात आहे. सध्या तरी भाजप पक्ष सोडण्याचा विचार नाही. मी काँग्रेस पक्षात जाणार असे कुठेही बोललो नाही असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना माजी खा. चिखलीकर लोकसभा म्हणाले की, निवडणूकीत मी पराभूत झालो सिडको भागातून असलो तरी मतदान मिळाले आहे तिथल्या लोकांना दक्षिण मधून विधानसभा लढवावी असे वाटते. हा माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान आहे. कोणी म्हणत आहे की मी तसेच पुढे बोलताना माजी खा. चिखलीकर म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिक पावसाने खरडून नेले आहे. त्यामुळे शेती पिकाचे तात्काळ पंचनामे करुन तातडीने मदत करावी अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR