23.9 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईच्या तापमानात घट

मुंबईच्या तापमानात घट

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात दोन दिवसांपासून मुंबईकरांना गुलाबी थंडीचा सामना करावा लागत आहे. असे असताना मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात घट झाली आहे. त्या तुलनेत उपनगरात पारा अधिक घसरला असून, सोमवारी उपनगरात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे मुंबईचे किमान तापमान आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या आठवड्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास तर किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या वर नोंदले गेले होते. मात्र, रविवारपासून त्यात घट होऊ लागली. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकर कडाक्याच्या थंडीचा सामना करत आहेत. सोमवारी हवामान खात्याच्या सांताक्रूझ केंद्रावर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस, तर कुलाबा केंद्रावर १९.८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले.

मुंबईत वाढले प्रदूषण
मुंबई शहर आणि उपनगरात प्रदूषण वाढत आहे. सोमवारी मुंबईत सर्वाधिक प्रदूषण नेव्ही नगर-कुलाबा येथे झाले. तेथील हवा निर्देशांक ३१५ होता. मुंबईत एकीकडे थंडी वाढत असताना दुसरीकडे हवेचे प्रदूषणही वाढत आहे. मोठ्या प्रमाणावर होणारी विकासकामे आणि वाहनांच्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR