25.9 C
Latur
Saturday, March 1, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईसह कोकणात उष्णतेची लाट; नागरिक हैराण

मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट; नागरिक हैराण

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. मुंबई आणि कोकणात फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेची लाट जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबईसह कोकणातील तापमान ४० अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. वाढत्या उन्हामुळे सार्वजनिक ठिकाणे ओस पडली आहेत. नागरिकांसोबतच पक्षी आणि प्राण्यांनाही या उष्णतेचा फटका बसत आहे.

पालघर, रायगड आणि रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टी परिसरातील तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे मुंबईतील तापमान ३५ अंश सेल्सिअसपासून ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. मुंबईत उन्हाच्या झळांमुळे गजबजलेली ठिकाणेही ओस पडली आहेत. नेहमी गर्दीने फुललेली दादर चौपाटीही उन्हामुळे रिकामी दिसत आहे. पहाटे या चौपाटीवर मोठ्या प्रमाणात नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात. मात्र, उन्हाचा त्रास टाळण्यासाठी नागरिक आता सकाळी किंवा संध्याकाळीच बाहेर पडण्यास प्राधान्य देत आहेत.

पहाटे दादर परिसरात २७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर दुपारी या तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या तापमानामुळे फक्त नागरिकच नव्हे, तर पक्षी आणि प्राण्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. अनेक पक्षी उष्माघाताने बेशुद्ध पडत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

श्वसन आणि घशाचे आजार
मुंबई शहरासह उपनगरांत वायुप्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत धुरकट वातावरण तयार झाले होते. मुंबईतील हवेचा गुणत्ता निर्देशांक काल १५५ वर पोहोचला होता. हा निर्देशांक धोकादायक श्रेणीतील समला जातो. हवेतील पीएम १० चे प्रमाण २०१ वर गेले आहे तर पीएम २.५ चे प्रमाण हे ६० वर पोहोचले होते. त्यामुळे श्वसनाचे आणि घशाचे आजार होण्याची शक्यता दाट आहे.

मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम
वाढत्या तापमानाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना काल सर्वदूर हवेत धूर पाहायला मिळाला. ज्याने दृष्यमानतेवर अंशत: परिणाम होत असल्याचे जाणवत आहे. मुंबई उपनगरांत तापमानाचा पारा ३१ अंश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR