28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, २६ प्रवासी जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, २६ प्रवासी जखमी

पुणे : प्रतिनिधी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक व खाजगी बसचा अपघात होऊन २६ प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुणे-मुंबई लेनवरील खोपोली हद्दीत बोरघाट उतरताना टायर पंक्चर झाल्यानंतर एक ट्रक बोगद्यामध्ये तिस-या लेनवर उभा होता.

त्यावेळी पाठीमागून येणा-या बाळूमामा कंपनीच्या खासगी बसची तिस-या लेनमध्ये उभा असलेल्या ट्रकला जबर धडक बसली. या बसमध्ये एकूण ३८ प्रवासी होते. त्यातील ८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात बस व ट्रक दोन्ही वाहने आयआरबीकडील हायड्राच्या व पुलरच्या साहाय्याने बाजूला घेऊन तिन्ही लेनवरील वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली आहे. या अपघातात बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आयआरबी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा, हेल्प फाऊंडेशन सामाजिक संस्था, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी बाहेर काढण्यात आल्े आहे. महामार्ग वाहतूक पोलिस केंद्र बोरघाट आणि खोपोली पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तातडीने पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR