23.3 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रमुलाचा, जावयाचा एकाच दिवशी अन्त

मुलाचा, जावयाचा एकाच दिवशी अन्त

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. नामपूर येथील हिरा हॉस्पिटलचे संचालक तथा भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सी. एन. पाटील, जि. प. सदस्या सुनीता पाटील यांच्या डॉक्टर मुलाचा आणि डॉक्टर जावयाचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. या दोघांवर एकाच दिवशी अन्त्यसंस्कार करण्याची वेळ दाम्पत्यावर आली आहे. या हृदयद्रावक घटनेने नाशिकवर शोककळा पसरली आहे.

कोरोना काळात डॉ. सी. एन. पाटील यांनी नागरिकांची अहोरात्र सेवा केली. गोरगरीब रुग्णांच्या हक्काचा दवाखाना म्हणून डॉ. पाटील यांची नाशिकमध्ये ओळख आहे. परंतु डॉक्टर मुलाचा कावीळने तर जावयाचा डेंग्यूने एकाच दिवशी मृत्यू झाल्याने पाटील आणि खैरनार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR