25 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुलींबाबत आमदार भुयारांनी केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी केली कानउघाडणी

मुलींबाबत आमदार भुयारांनी केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी केली कानउघाडणी

 बारामती : प्रतिनिधी
  अजित पवारांचे समर्थक आणि आमदार देवेंद्र भुयार यांचे महिलांबाबत अत्यंत अपमानजनक वक्तव्य समोर आले आहे. मुलींच्या लग्नाबाबत केलेल्या विधानावरून त्यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे. तर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही या वक्तव्याची दखल घेऊन नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी देवेंद्र भुयार यांच्याशी संपर्क साधून त्यांची कानउघाडणी केल्याची माहिती खुद्द अजित पवारांनी दिली. ते माध्यमांशी बोलत होते.
 अजित पवार म्हणाले, देवेंद्र भुयारांचे वक्तव्य मुलींना वेदना देणारे होते. शेतक-यांबद्दल अपमान वाटणारे होते. याबाबत मला कळाल्या कळाल्या मी रात्री त्यांना फोन केला. ते शेतकरी संघटनेतून निवडून आले होते. त्यांनी मला सांगितले की माझ्या बोलण्याचा हेतू तसा नव्हता. शेतक-यांच्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनात मुली नोकरदारांना प्राधान्य देतात. पूर्वी मुली प्राधान्य बागायतदारांना द्यायच्या. ते बोलताना चुकले आहेत. चूक ती चूकच आहे. त्यासंदर्भात मी त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मला अजिबात त्यांचं स्टेटमेंट योग्य वाटलं नाही. त्यांनी त्यांचे स्टेटमेंट मागे घेण्याबाबत मी त्यांना सांगितले आहे, अशा शब्दांत अजित पवारांनी त्यांची कानउघाडणी केली.
एका कार्यक्रमात बोलताना आमदार भुयार म्हणाले, तरुण मुलगा शेतकरी असेल, तर त्­याला लग्­नाला कुणी मुलगी देत नाही, अशी परिस्थिती आहे. एक नंबर स्मार्ट, देखणी मुलगी हवी असेल तर ती तुमच्या-माझ्यासारख्यांंना भेटत नाही, ती नोकरीवाल्याला भेटते. दोन नंबरची मुलगी ही कुणाचा छोटा-मोठा व्यवसाय असेल, किराणा दुकान असेल, तर त्याला मिळते अन् तीन नंबरचा जो गाळ गाळ शिल्लक राहतो  ती पोरगी शेतक-याच्या पोराला मिळते. म्हणजे शेतक-यांच्या पोराचे काही खरे राहिले नाही, असे देवेंद्र भुयार म्हणाले होते. याच विधानावरून त्यांच्यावर टीका झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR