निलंगा : प्रतिनिधी
आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपले आई-बाप होय. आपल्या आई-बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा, त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा, कारण आई-बापाचा श्वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आई-बाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाहीत याची जाणीव ठेवा, असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते बसंत हंकारे यांनी व्यक्त केले. यावेळी व्याख्याते हंकारे यांनी आई-वडिलांविषयी भावनेला हात घत्तलणारे मार्गदर्शन केल्याने उपस्थित मुलींसह पालकांचे आश्रू अनावर झाले होते.
येथील वृंदावन मंगल कार्यालयात अक्काफाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘आई-बाप समजूत घेताना’ कार्यक्रम बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे प्रदेश सचिव अरंिवद पाटील निलंगेकर, गटशक्षिणाधिकारी सुरेश गायकवाड, संगांयो कमिटीचे अध्यक्ष शेषेराव ममाळे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, शहराध्यक्ष विरभद्र स्वामी, दत्ता मोहळकर, प्रल्हाद बाहेती अदी उपस्थित होते.
हंकारे म्हणाले की, मुला मुलीच्या आयुष्यात फक्त एकच देव आहे, तो म्हणजे बाप आणि एकच देवी आहे, ती म्हणजे आपली आई. आज आपल्या आई बापाला समजून घेण्याची वेळ आली आहे. आपल्या एखाद्या कृत्याने आई-बापाची मान खाली जाईल असे कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घ्या, तुम्ही आयपीएलचे रन मोजतात, त्यांचा हिशेब ठेवता पण आपल्या बापाने आपल्यासाठी किती रन काढले याचा हिशेब तुम्ही कधी करणार? असे ते म्हणाले. शिवाय भविष्यात डॉक्टर, इंजिनिअर, वकील झालात आणि लाखो रुपये कमवून ठेवले मात्र ते पाहण्यासाठी जर आई-बाप नसतील तर त्या कमावलेल्या पैशांचा उपयोग होणार काय? असा सवाल त्यांनी केला. प्रास्ताविक प्रणिता केदारे यांनी केले तर सुत्रसंचलन प्रशांत पाटील व आभार दत्ता मोहळकर यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.