मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे, मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. गेल्या १ तासापासून मुंबईत ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे दिल्ली – मुंबई विमान हे हैदराबादकडे वळवण्यात आलं आहे. खराब हवामानामुळे विस्तारा कंपनीच विमान हैदराबादला रवाना करण्यात आलं. मुंबईत लँडिंग होऊ शकणार नसल्याने हे विमान हैदराबादला रवाना करण्यात आलंय. विस्तारा कंपनीची दोन विमान मुंबईऐवजी हैदराबादला रवाना केली गेली आहेत.
मुंबईत आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता. उद्याही मुंबई, ठाणे, रायगड या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांची यामुळे चांगलीच कसरत झाली. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने लोकांना पाण्यातून वाट काढावी लागली.
नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे सानपाडा भुयारी मार्ग पाण्याखाली गेला आहे.