27.6 C
Latur
Monday, May 27, 2024
HomeFeaturedमोदींच्या ‘रोड शो’ला अजित पवारांची दांडी

मोदींच्या ‘रोड शो’ला अजित पवारांची दांडी

मुंबई : प्रतिनिधी
निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या १३ जागांसाठी महायुतीकडून जोरदार ताकद लावली जात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिंडोरीत सभा झाल्यानंतर मुंबईत घाटकोपरमध्ये रोड शो होत आहे. मात्र, या रोड शोमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले नाहीत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अजित पवार आज (बुधवारी) मुंबईत देवगिरी निवासस्थानी विश्रांती घेत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी प्रचार रॅली होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR