28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयमोदींना पंतप्रधान होण्यापासून रोखण्यासाठी मी काहीही करेन

मोदींना पंतप्रधान होण्यापासून रोखण्यासाठी मी काहीही करेन

हैदराबाद : एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवणारे उमेदवार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, मी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींशिवाय इतर कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देण्यास तयार आहे. यासोबतच पंतप्रधान मोदींना पुन्हा पंतप्रधान होण्यापासून रोखण्यासाठी मी काहीही करेन, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत भाजपने माधवी लता यांना हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून ओवेसी यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. या जागेवरून ओवेसी यांनी लताचा पराभव करत ३३८०८७ मतांनी विजयी मिळवला. प्रसारमाध्यमांशी बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, निवडणुकीच्या वेळीच मी म्हटलं होतं की नरेंद्र मोदींशिवाय इतर कोणीही पंतप्रधान होत असेल, तर मी त्याला पाठिंबा देईन.

निवडणुकीच्या निकालाचा संदर्भ देत ओवेसी म्हणाले की, देशातील वातावरणानुसार भाजपला इतक्या जागा मिळायला नको होत्या. जर आम्ही योग्य काम केले असते तर भाजपला केवळ १५० जागा मिळाल्या असत्या. आम्ही त्यांना सरकार बनवण्यापासून रोखू शकलो असतो. जनतेला तेच हवे होते, असा दावाही ओवेसी यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR