27.6 C
Latur
Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रयापुढे काळजी घेऊ....

यापुढे काळजी घेऊ….

जिरेटोप प्रकरणावरून अखेर पटेलांना उपरती

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघामधून तिस-यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असलेला जिरेटोप भेट देत मोदींच्या डोक्यावर चढवला. आता विरोधकांनी मोदी आणि पटेलांना या मुद्यावरून निशाण्यावर घेतले. जोरदार टीका केल्यानंतर ‘यापुढे काळजी घेऊ’ अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी या प्रकरणावर दिली आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. पटेल म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ, असे पटेल म्हणाले. पटेल यांना अखेर उपरती झाली आहे.

कालच्या वसईच्या सभेत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यासह भाजपचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला. त्यांनी प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदींना जिरेटोप घातल्याच्या कृतीचा जाहीर निषेध केला. उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधान मोदींचा अर्ज भरायला प्रफुल्ल पटेल गेले होते. पटेल आता तुम्ही लाचार झाला आहात. मोदींच्या चरणी लीन झाला आहात. तेथे लीन होताना महाराजांचा टोप ठेवता, अजून किती झुकणार आहात? असे खडेबोल ठाकरेंनी पटेलांना सुनावले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR