24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeपरभणीयुवा नेते सुरेश नागरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

युवा नेते सुरेश नागरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

सेलू : अखील भारतीय काँगेस पक्षाचे प्रदेश सचिव सुरेश कुंडलिकराव नागरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवार, दि.६ ऑक्टोबर रोजी युवा नेते सुरेश नागरे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन नंतर शहरात भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच शहरातील कामील अवलिया हझरत सय्यद शाहबुद्दिन व हझरत सय्यद बुरहानुद्दिन अवलिया यांच्या दर्गावर फुलांची चादर चढवून रॅलीचा समारोप बाहेती मंगल कार्यालयात करण्यात आला.

या ठिकाणी झालेल्या सभेत सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी, लहाने बोरगाव, देऊळगाव गात, धेंगली पिंपळगाव, खवणे पिंपरी, राजा, वाकी, शिराळा, कवडधन, डासाडा, चिकलठाना, राधे धामणगाव, खादगाव, नागठाना, बोरकिनी, वलंगवाडी, तडतुंबा, लाडनांद्रा, हिस्सी येथिल असंख्य कार्यकर्त्यांनी युवा नेते सुरेश नागरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी अखील भारतीय काँगेस पक्षाचे प्रदेश सचिव सुरेश नागरे, काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, काँगेस पक्षाचे जिंतूर तालुका अध्यक्ष प्रसाद बुधवंत, काँगेस पक्षाचे सेलू तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब जोगदंड, काँगेस पक्षाचे सेलू शहराध्यक्ष पठाण रहीम खान, कमल लोखंडे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात सेलु शहरासह तालुक्यातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR