28.7 C
Latur
Monday, July 14, 2025
Homeमहाराष्ट्रयेत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार

येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार

पुणे : सध्या शेतक-यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नैऋत्य मोसमी वारे म्हणजे मान्सून रविवारी (दि. १९) अंदमानात दाखल होणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच, राज्यातील अवकाळी पाऊस १९ नंतर ओसरेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी राजाच्या चेह-यावर आनंद झळकणार आहे.

दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनच्या हालचाली दिसून येत आहेत. दरवर्षी मान्सून अंदमानात १९ मेच्या आसपास दाखल झालेला पाहायला मिळतो. दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर समुद्र सपाटीपासून १ ते १.५ किलोमीटर उंचीवर नैऋत्येकडून येणा-या वा-यांचे प्रवाह आणि पावसाच्या हजेरीने मान्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करण्यात येते.

पुढील दोन ते तीन दिवसांत अंदमान -निकोबार बेट समूह आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून प्रगती करण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मान्सून साधारणत: २१ मेपर्यंत अंदमानची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोहोचतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो. यंदा मान्सून रविवारी (दि. १९) अंदमानात दाखल होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR