27.9 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeपरभणीयोगासाधना ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली : सोन्नेकर

योगासाधना ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली : सोन्नेकर

सेलू : चालणे हा सर्वात चांगला व्यायाम आहे. पण या सोबतच सुक्ष्म व्यायामही गरजेचा आहे. नियमित योगासने केल्यास आरोग्यदायी जीवन मिळते. योगसाधना ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन नूतन विद्यालयाचे पर्यवेक्षक देविदास सोन्नेकर यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित एक दिवस एक पुस्तक उपक्रमांतर्गत जागतिक योग दिनानिमित्त सोमवारी ग्रंथालयाच्या सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सृष्टी सोळंके आणि शौर्य फटाले या विद्यार्थ्यांच्या योगासनांच्या प्रात्यक्षिकांसह क्रीडा शिक्षक सोन्नेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योग अभ्यासक बालासाहेब गजमल होते. तर भगवान कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना सोन्नेकर म्हणाले की, प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. हे जाणून योगसाधना करायला हवी. विद्यार्थ्यांनी योगासनाचे पायाभूत ज्ञान घ्यावे. असेही ते म्हणाले. प्रमुख वक्ते सेवा निवृत्त शिक्षक भगवान कुलकर्णी यांनी योगसाधना या स.ना. पोकळे यांच्या पुस्तकावर मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, प्रकाश धामणगावकर, अजित मंडलिक, रमा बाहेती, प्रणिता सोलापुरे, भरदम, संजय विटेकर, रामराव गायकवाड, प्रा.नागेश कान्हेकर, गणेश माळवे, सुरेखा रामदासी, विनायक मोगल, सुष्मिता गाजरे, दत्तात्रय आंधळे, विनायक धामणगावकर, यशवंत चारठाणकर, मधूकर वाकडीकर, रश्मी बाहेती यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शरद ठाकर यांनी केले. सुत्रसंचलन अनंत मोगल यांनी केले. तर आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे सचिव चंद्रशेखर मुळावेकर यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR