39.6 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeलातूररंग खेळताना दमा रुग्णांनी काळजी घ्यावी: डॉ. रमेश भराटे

रंग खेळताना दमा रुग्णांनी काळजी घ्यावी: डॉ. रमेश भराटे

लातूर : प्रतिनिधी
रंगपंचमी किंवा धुलिवंदन हा सण भारतात खुप उत्साहात साजरा केला जातो. विविध रंगांची ऊधळन करुन राग लोभ, मत्सर विसरुन हा सण साजरा केला जातो. परंतु ऊत्साहात आपण कधी कधी चुकीच्या गोष्टी करुन एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावर पण बेततो व जीवघेणा प्रसंग ओढवू शकतो. रंग खेळताना रंग हे नैसर्गिक रित्या तयार केलेले असावेत, केमिकल किंवा रसायनयुक्त रंग टाळावेत.  डांबर, ऊग्र दर्प असलेले कलर टाळावेत. ज्यांना त्वचेचे विकार आहेत त्यांनी केमिकल युक्त्त कलरपासुन दुर रहावे. ज्यांना अ‍ॅलर्जी, दमा किंवा श्वसनविकार आहे, अशा रुग्णांनी रंग टाळावेत, असे आवाहन श्वसनविकार व दमारोग तज्ज्ञ डॉ. रमेश भराटे यांनी केले.
दमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छवासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय असा आवाज योतो. खोकला येतो, रात्रीच्या वेळी किंवा पहाटे खोकला अधिक प्रमाणात येणे.
खोकल्याची उबळ अधिकतेने येत असते मात्र छातीत कफ इतका चिकटलेला असतो की खोकून-खोकून व्य्क्ती बेजार होते पण कफ सुटत नाही. श्वास घुटमळल्यासारखे होते, बराच वेळ खोकल्यावर थोडा जरी कफ पडला तरी काही काळापुरते बरे वाटते. पण पुन्हा खोकला येतोच. दम लागतो, बैचेनी होते, वारंवार छाती चोंदणे, बोलण्यास त्रास होतो ही लक्षणे अस्थमामध्ये असू शकतात. थंड पदार्थ, धुळ, रंगाचा त्रास दमा रुग्णांना मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे दमा रुग्णांनी रंग खेळताना काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. रमेश भराटे यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR