22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूररक्ताचा तुटवडा; रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ 

रक्ताचा तुटवडा; रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ 

लातूर : प्रतिनिधी
वाढत्या उन्हामुळे रक्तदान शिबिरे होत नाहीत. परिणामी लातूर शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे.  उन्हाच्या तीव्रतेने सर्वच रक्त गटांच्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. उन्हामुळे रक्तदान शिबिरे होत नाहीत. रक्तदाते मिळत नाहीत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. डोनर हिस्ट्री पाहून रुग्णाला आवश्यक असणा-या रक्त गटाचे रक्त रुग्णांच्या नातेवाईकांना मिळवून देण्याचा प्रयत्न रक्तपेढ्या करीत आहेत.
 विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यात थॅलेसेमियाचे दोनशेपेक्षा अधिक रुग्ण आहेत. या रुग्णांना सातत्याने रक्ताची गरज पडते. त्यासाठीही सध्या उणिव भासत आहे. शहरातील सिव्हिल रक्तपेढी, भालचंद्र रक्तपेढी, सरस्वती रक्तपेढी, माऊली रक्तपेढी, संजीवनी रक्तपेढी, लातूर रक्तपेढी, अर्पण रक्तपेढी या रक्तपेढ्यांमध्ये जवळपास सर्वच रक्त गटांच्या रक्ताचा तुटवडा आहे.  सध्या उन्हाची तीव्रता इतक्या प्रचंड प्रमाणात आहे की, दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहेत.ि अशा परिस्थितीत रक्तदान शिबिरे होत नाहीत. सामाजिक संस्था, संघटनांकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात नाही. त्यामुळे शहरात रक्ताचा तुटवडा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR