27.2 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeलातूररमाई आवासचे थकीत हप्ते तात्काळ द्या

रमाई आवासचे थकीत हप्ते तात्काळ द्या

लातूर : प्रतिनिधी

रमाई आवास योजनेतील थकीत हप्ते संबंधीत लाभार्थ्यांना तात्काळ द्यावे, शहरातील कच-याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे तसेच गटारींची साफ-सफाई नियमित करण्यात यावी, या मागण्यांचे निवेदन काँग्रेसच्या लातूर शहर व जिल्हा अनूसुचित जाती विभागाच्या वतीने दि. २७ जून रोजी लातूर शहर महानगरपालिका उपायुक्तांना देण्यात आहे.

रमाई आवास योजनेतील थकीत हप्ते वेळेवर मिळत नाहीत, कच-याचे व्यवस्थापन निटपणाने होत नाही, गटारींची साफ-सफाई केली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनूसार लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या लातूर शहर जिल्हा अनूसूचित जाती विभागाचे अध्यक्ष प्रा. प्रविण कांबळे यांच्या नेतृत्वाखाली लातूर महानगरपालिका उपायुक्त शुभत क्यातमवार यांना रमाई आवास योजनेतील थकीत हप्ते संबंधीत लाभार्थ्यांना तात्काळ द्यावे, शहरातील कच-याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे तसेच गटारींची साफ-सफाई नियमित करण्यात यावी, या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्या तात्काळ सोडवाव्यात अन्यथा महानगरपालिका कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी दगडूअप्पा मिटकरी, गोरोबा लोखंडे, असिफ बागवान, दत्ताभाऊ सोमवंशी, नागसेन कामेगावकर, आयुब मणियार, भाऊसाहेब भडीकर, अ‍ॅड. सुमित खंडागळे, अंगद वाघमारे,रह्याज क्षीरसागर, नानासाहेब डोंगरे, राहुल दुमणे, यशपाल कांबळे, राजु गवळी, अस्लम शेख, अ‍ॅड. अंगद गायकवाड, दिलीप गायकवाड, बब्रूवान गायकवाड, किरण बनसोडे, संजय सुरवसे, राजाभाऊ गायकवाड, सुरेश गायकवाड, आकाश मगर, दयानंद कांबळे, पंकज सोनवणे, अजीम शेख, करण गायकवाड, सुधाताई कांबळे, शोभाताई ओहाळ, मीनाताई टेंकले, शिल्पाताई कांबळे, धनराज गायकवाड, हरिदास मगर, मारुती बाणाटे, प्रविण मगर, यशपाल सूर्यवंशी, पी. के. सावंत, प्रा. अशोक गायकवाड आदी पदधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR