25.6 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeमहाराष्ट्ररवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही

रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही

मुंबई : प्रतिनिधी
संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना म्हटले की, रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही. वनराई पोलिस स्टेशनचे राजभर हे अचानक रजेवर का गेले? वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फोन पोलिस स्टेशन मधून बदलण्याचा प्रयत्न झाला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राज्यासह देशातील अनेक मतदारसंघांमध्ये काट्याची टक्कर पहायला मिळाली. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांनी फक्त ४८मतांनी विजय मिळवला. त्यामुळे वायकर यांच्या विजयासाठी ईव्हिएम मध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला जात आहे. मात्र हे आरोप शिंदे गटाने फेटाळले आहेत.

शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर यांनी मतमोजणीवेळी मोबाइलचा वापर करून डळढ द्वारे ईव्हीएममध्ये छेडछाड केला असल्याची तक्रार अपक्ष उमेदवार भरत शाह आणि मोहन अरोरा यांनी दिली होती. यानंतर आता मंगेश पंडीलकर यांच्यासह निवडणूक कर्मचारी दिनेश गुरव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच आता या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे.

वायकर यांचा खास माणूस(जो त्यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते) निवृत्त पी आई सातारकर हे वनराई पोलीस स्टेशनमध्ये चार दिवसांपासून काय डील करत होते? वनराई पोलीस स्टेशन चे सीसीटीव्ही फुटेज लगेच जप्त करुन चौकशी केली पाहिजे. वादग्रस्त फोन फोरहंसिक लॅब मध्ये पाठवल्याचे ऐकले. मात्र पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात बेवड्या आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून क्लीनचीट देणारे हेच लॅबवाले आहेत! लॅब गृह खात्याच्या अंतर्गत येतात! संजय राऊतांच्या या आरोपांनंतर हे प्रकरण आणखी तापले आहे. आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया दिली जाते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR