31.9 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeमहाराष्ट्ररवी राणा यांच्या घरी चोरी

रवी राणा यांच्या घरी चोरी

मुंबई : अपक्ष आमदार रवी राणा यांच्या नोकराने दोन लाखांची कॅश चोरी करून पलायन केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. अर्जुन मुखिया असे या नोकराचे नाव असून त्याच्याविरुद्ध खार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

चोरीनंतर अर्जुन हा बिहारच्या गावी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी एक टीम तिथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मालकीचा खार परिसरात एक फ्लॅट आहेत. या फ्लॅटची सर्व जबाबदारी त्यांचा खाजगी पीए संदीप सुभाष ससे यांच्यावर आहे. याच फ्लॅटमध्ये गेल्या दहा महिन्यांपासून अर्जुन हा घरगडी म्हणून कामाला होता. तो मूळचा बिहारच्या दरभंगाचा रहिवासी आहे. दिवसभर काम करून तो तिथे राहत होता. मार्च महिन्यात तो होळीनिमित्त त्याच्या गावी गेला आणि परत आलाच नाही. त्यामुळे संदीप ससे यांनी त्याला अनेकदा कॉल केला होता, मात्र त्याने कॉल घेतला नाही.

फेब्रुवारी महिन्यात घरखर्चासाठी रवी राणा यांनी त्यांना दोन लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्यांनी त्यांच्या कपाटात ठेवली. आज सकाळी त्यांनी घरखर्चासाठी काही रक्कम काढण्यासाठी कपाट उघडले असता कपाटात दोन लाख रुपये नव्हते.   या फ्लॅटमध्ये त्यांच्यासह अर्जुन वगळता इतर कोणीही येत नव्हते. त्यामुळे अर्जुननेच ही चोरी करून होळीचा बहाणा करून गावी पलायन केले असावे, असा त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार रवी राणा यांना फोनवरून सांगितला. त्यानंतर त्यांनी खार पोलिस ठाण्यात अर्जुनविरुद्ध चोरीची तक्रार दाखल केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR