23.3 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeपरभणीरस्ता हीच नागरिकांची जीवन वाहिनी : डॉ.अंकुश लाड

रस्ता हीच नागरिकांची जीवन वाहिनी : डॉ.अंकुश लाड

मानवत : रस्ता हीच नागरिकांची जीवन वाहिनी असून शहरातील कोणताच नागरिक रस्त्यापासून वंचित राहणार नाही या साठी मी नेहमीच बांधील राहील असे प्रतिपादन शहराचे युवा नेते डॉ. अंकुश लाड यांनी केले.

मानवत शहरात एकमेव असणारे तुकाराम महाराज मंदिर व त्यासमोरील सभागृह उद्यान या मंदिराकडे जाण्यासाठी जाणारा प्रमुख रस्ता आणि त्यातील अंतर्गत चार नागरी वसाहतींना जोडणा-या मुख्य रस्त्याचे उद्घाटन २२ जून रोजी युवा नेते डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी युवा नेते डॉ. लाड बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की प्रत्येक नागरिकाला दळणवळणासाठी रस्ता हेच प्रमुख साधन असते. त्यामुळे शहरातील प्रत्येक गल्ली, नगरमध्ये रस्ता काम पालिकेच्या मार्फत पूर्णत्वास नेल्या जाईल असे त्यांनी सांगितले.

शहरातील तुकाराम महाराज मंदिर व त्यासमोरील सभागृहाचे काम नागरिकांच्या सहकायार्तून हाती घेतले होते. तुकाराम महाराज मंदिर हे मानवत वासियांसाठी आगळे वेगळे आकर्षण राहणार आहे. परंतु मंदिरकडे जाण्यासाठी नागरिकांना रस्ता नव्हता.

पावसाळ्यात चिखल तुडवत या परिसरातील नागरिकांना ये जा करावी लागत असे. हा रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी मागणी परिसरातील नागरीक करू लागले होते. याच मागणीचा पाठपुरावा करत युवा नेते डॉ. लाड यांनी साधारणत: ३० फूट रुंदीचा प्रमुख रस्ता काम हाती घेत प्रशासकीय स्तरावरून त्याची मान्यता मिळवत या कामांचे उद्घाटन करण्यात आले. हा रस्ता मजबुतीकरण करून त्यावर सिमेंट रास्ता तयार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास उद्धघाटक म्हणून डॉ. अंकुश लाड उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत बापुराव रोड़े, ज्ञानोबा काठे, बालासाहेब रोडे, अंगद शिंदे, संभा काटकर, बालाजी हातकडके, महेश उपलंचवार, गंगाधर रोडे, हनुमान वावरे, नामदेव हेडगे, दिलीप शेंडगे, ज्ञानेश्वर हेंडगे, मारोतराव गडदे, ओमप्रकाश दहिने, सत्यशील धबडगे, कपिल खके, रामराव येवले, पंकज पवार, सुरेशराव होंगे, मुंजा मारोती रोडे, रामभाऊ हेंडगे, मारोतरव रसाळ, अर्जुन दहे, शेख अफसर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR