30.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रराजकारण असंतुष्ट आत्म्यांचा सागर

राजकारण असंतुष्ट आत्म्यांचा सागर

नागपूर : प्रतिनिधी
राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा सागर आहे. इथे कुणीही समाधानी नाही. प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या झाल्यात, त्यामुळे जीवनातील आनंद हरवलाय, असं भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत. राजकारण असो की कार्पोरेट जग असो इथे प्रत्येक जण असंतुष्ट असल्याचे मनोगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय, ते काल ५० गोल्डन रुल ऑफ लाईफ या पुस्तक प्रकाशन सोहळ्या नागपूर येथे बोलत होते.

कोणत्याही विषयावर बोलताना आढेवेढे न घेता थेट भाष्य करणा-या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मार्मिक टिपण्णी केलीय. ते म्हणाले की, जो नगरसेवक झालाय, त्याला दु:ख आहे की आमदार झालो नाही, जो आमदार झालाय, त्याला मंत्री होता आले नसल्याचं दु:ख आहे, तर जो मंत्री झालाय त्याला मनासारखे खाते मिळाले नसल्याचे दु:ख आहे आणि मुख्यमंत्री होता न आल्याचे शल्य त्यांच्या मनात आहे. जो मुख्यमंत्री झाला आहे, त्याला पक्षश्रेष्ठी केव्हा पदावरून बाजूला करतील याची भीती सतावतेय. राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा सागर आहे. इथे कुणीही समाधानी नाही. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग असल्याचे गडकरी म्हणालेत.

ते पुढे लिहितात की, जीवन हा तडजोडी, मजबुरी, अडथळे आणि विरोधाभासांचा खेळ आहे. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय किंवा कॉर्पोरेट जीवन असले तरी ते आव्हाने आणि समस्यांनी भरलेले असते. त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ समजून घ्यावे लागेल, असंही नितीन गडकरींनी अधोरेखित केलंय.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR