19.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमुख्य बातम्याराजस्थानच्या वाळवंटात उसळला पाण्याचा मोठा फवारा

राजस्थानच्या वाळवंटात उसळला पाण्याचा मोठा फवारा

लुप्त सरस्वती नदीच्या प्रकटीकरणाची चर्चा

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जैसलमेर जिल्ह्यातील मोहनगडमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. बोअरसाठी खोदकाम सुरू असताना पाण्याचा मोठा प्रवाह वेगाने वाहत होता. हा पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता, की पाण्याचा प्रवाह रोखणे आता कठीण बनले होते. राजस्थानच्या जैसलमेरच्या या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. या व्हीडीओमध्ये एक जेसीबी आणि मोठे वाहन जमिनीखालून येणा-या पाण्यामध्ये बुडालेले दिसत आहे आणि आतून पाण्याचा प्रवाह वेगाने वर येताना दिसत आहे.
पुरातन सरस्वती नदी जैसलमेरच्या मोहनगडमध्ये जिथून पाण्याचा प्रवाह एवढया वेगाने वाढत होता, तिथून जात असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे हा प्रवाह दुसरा तिसरा काही नसून लुप्त झालेली सरस्वती नदी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सजग टीमने याचा तपास सुरू केला, तेव्हा सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू असल्याचे, प्रत्येकजण या घटनेबाबत वेगवेगळे दावे करत असल्याचे निदर्शनास आले आणि अनेकांनी वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या. केर्न एनर्जीची टीम बाडमेरहून जैसलमेरला येऊन मोहनगड घटनेची चौकशी करणार आहे.
जैसलमेरमधील मोहनगडचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहत असल्याचा व्हायरल झालेला व्हीडीओ १०० टक्के खरा आहे, मात्र सरस्वती नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबाबत केल्या जाणा-या दाव्यांसाठी अद्याप कोणताही पुरावा समोर आलेला नाही. घटनास्थळी पोहोचलेले भूजल शास्त्रज्ञ एन.डी. इनाखिया यांनी सांगितले की, बोअरवेल खोदत असताना अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याची घटना सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी आहे. हा तपासाचा विषय असून त्यावर पुढील माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

जैसलमेर जिल्ह्यातील मोहनगडमध्ये कूपनलिका खोदण्यासाठी आणलेले बोअरिंग मशिन ट्रकसह जमिनीत गाडले गेले. पाण्याचा वेग पाहून प्रशासनाने ५०० मीटर पर्यंतचा परिसर रिकामा केला. दुसरीकडे, ओएनजीसीच्या अधिका-यांनी घटनास्थळी पोहोचून जमिनीतून बाहेर पडणा-या पाण्याची तपासणी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR