22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यस्तरीय राजकुमार काळभोर मराठी साहित्य संमेलनाध्यपदी वसुधा नाईक

राज्यस्तरीय राजकुमार काळभोर मराठी साहित्य संमेलनाध्यपदी वसुधा नाईक

४ ऑगस्टला पुणे येथे होणार संमेलन

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३ रे राज्यस्तरीय राजकुमार काळभोर मराठी साहित्य संमेलन महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी (पुणे) येथे रविवार दि. ४ ऑगस्ट २०२४ रोजी होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द साहित्यिका वसुधा नाईक यांची निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिध्द साहित्यिक शरद गोरे यांनी दिली.

नाईक यांनी आजवर शब्द फुलांची ओंजळ, गुंजन मनीचे सह ८ ग्रंथाचे विपुल लेखन त्यांनी केले आहे. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे,तर या साहित्य संमेलनाच्या कविसंमेलन सत्राच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द कवी प्रा.विजय काकडे यांची निवड करण्यात आली. आजवर काकडे यांचे भास आभास, माझा शाळेचा प्रवेशदिन सह एकूण ५ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत, एक दिवशीय होणा-या या साहित्य संमेलनात मोठया संख्येने साहित्यिक सहभागी होणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांनी २९ वर्ष अविरतपणे साहित्य संवर्धनाचे कार्य केले. त्यांच्या स्मृतिनिमित्त या साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. साहित्य संमेलनाच्या संयोजनासाठी साहित्य परिषदेचे माजी विश्वस्त किशोर टिळेकर, पुणे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत नामूगुडे, पुणे जिल्हाध्यक्ष (पूर्व) जिल्हा उपाध्यक्ष शुभांगी घुले, पुणे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर धायरीकर, शहर उपाध्यक्ष सिंधू साळेकर आदीजण परिश्रम घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR