22.3 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात गारठा वाढला

राज्यात गारठा वाढला

  पुणे : प्रतिनिधी
  राज्यात पावसाच्या सरींनी धुमाकूळ घातल्यानंतर आता नैऋत्य मान्सून आणि पाऊस परतीचीच वाट धरताना दिसत आहे. दाना चक्रीवादळामुळे मुंबईसह महाराष्ट्रावर होणारे परिणामसुद्धा बहुतांशी कमी झाले आहेत. राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली असून वातावरणात गारठा वाढला आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाच्या दिवाळीत एकीकडे गुलाबी थंडी चाहूल देताना दिसली तरीही काही भागांमध्ये मात्र पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसणार आहे. पुढील २४ तासांमध्ये राज्यात विदर्भ आणि नजीकच्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, कोकण पट्ट्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढल्याने तापमानात वाढ झाल्याचे जाणवणार आहे. एकंदरच राज्यातील कमाल आणि किमान तापमानात दरम्यानच्या काळात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला तापमानात काहीशी घट होणार असून, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल लागणार आहे. तिथे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमधूनही पावसाने केव्हाचीच माघार घेतली असून, आता तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. हिमालयावरून येणा-या शीतलहरींनी आता वेग धारण करण्यास सुरुवात केल्यामुळे हवेत गारठा जाणवू लागला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR