28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीराज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत परभणी जिल्हा संघास चार पदके

राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत परभणी जिल्हा संघास चार पदके

परभणी : महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असो व पुणे जिल्हा वतीने बालेवाडी येथे दि.२ ते ६ डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस टेबल स्पर्धेत परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.

या स्पर्धेमध्ये वैयक्तिक गटामध्ये ११ वर्ष मुलीच्या गटात अद्या बाहेतीने राज्य अजिंक्यपद प्राप्त केले तसेच १३ वर्षे मुलींच्या गटात उपविजेतेपद प्राप्त केले. तिला दुहेरी मुकुटाची हुलकावणी मिळाली. याच गटामध्ये शरयू टेकाळे या खेळाडूने उप- उपांत्य पूर्व फेरी खेळत आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. तसेच १५ वर्ष मुलांच्या गटांमध्ये शिवनंदन पुरी या खेळाडूने उप-उपांत्य पूर्व फेरी खेळत आपल्या कौशल्याचे कसब दाखवले. याचबरोबर सांघिक गटामध्ये परभणीच्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत महिला गटामध्ये कांस्यपदक प्राप्त केले.

या संघामध्ये साक्षी देवकते, राशी वट्टमवार, भक्ती मुक्तावार, ओवी बाहेती, आद्या बाहेती या खेळाडूंचा समावेश होता. तसेच १७ वर्षे सांघिक गटामध्ये परभणीच्या खेळाडूंनी कांस्यपदक पटकावले. या संघात शिवनंदन पुरी, अक्षज कवठेकर, गौरांग वैजवाडे, गौरव पत्तेवार यांचा समावेश होता. या स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून चेतन मुक्तावर आणि विक्रम हप्तेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये परभणी संघाने वैयक्तिक आणि सांघिक प्रकार यांच्यामध्ये मिळून एकूण ४ पदके पटकावली.

या स्पर्धेमध्ये सर्वात आकर्षणाची बाब म्हणजे १० वर्षाच्या आद्या बाहेतीने एकाच स्पर्धेत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य ही तीनही पदके आपल्या नावे केली. यामध्ये ११ वर्ष वैयक्तिक गटात सुवर्ण, तेरा वर्ष वैयक्तिक गटात रौप्य तर महिलांच्या सांघिक गटात कांस्यपदक मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

याल यशाबदल जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, नानक सिंग बस्सी, सुयश नाटकर, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष समशेर वरपुडकर, कार्याध्यक्ष डॉ.माधव शेजुळ, जिल्हा उपाध्यक्ष संतोष सावंत, परभणी क्लबचे सचिव विवेक नावंदर, जिल्हा सचिव गणेश माळवे, डी.पी.पंडीत, वरिष्ठ खेळाडू, पालक यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR