22.8 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रराज्य साखर कारखाना कामगारांचा संप स्थगित

राज्य साखर कारखाना कामगारांचा संप स्थगित

इस्लामपूर : महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने १६ डिसेंबर २०२४चा साखर कामगारांचा बेमुदत संप स्थगित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव भोसले यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दि. ११ डिसेंबरला शासन आदेशानुसार साखर कारखाना प्रतिनिधी, कामगार संघटना प्रतिनिधी, शासन प्रतिनिधी यांची त्रिपक्षीय समिती गठित करून लवकरात लवकर साखर कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, असे निर्देश दिले आहेत.

शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असल्याने राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनीसुद्धा दोन्ही राज्य संघटनांना बेमुदत संप स्थगित करण्याचे आवाहन केले असल्याचे सरचिटणीस शंकरराव भोसले यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR