24.3 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे छ. संभाजीनगर दौ-यावर

राज ठाकरे छ. संभाजीनगर दौ-यावर

मनसेकडून विधानसभेची जय्यत तयारी सुरू

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून आता विभागनिहाय दौरे सुरू आहेत. आज पुन्हा राज ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौ-यावर असून याठिकाणी मनसेच्या पदाधिका-यांसोबत त्यांची बैठक होणार आहे.

निवडणुकीची रणनीती आखणण्यासाठी राज ठाकरे स्वत: मैदानात उतरून राज्यात विविध ठिकाणी दौरे करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील इच्छुक उमेदवारांसोबत राज ठाकरे संवाद साधणार आहेत.

त्यानंतर ६ ऑक्टोबरला राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल होतील. याठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून ते तयारीचा आढावा घेतील. त्यानंतर ७ ऑक्टोबरला राज ठाकरे पुणे दौ-यावर असणार आहेत. दरम्यान, मनसेचा कार्यकर्त्यांचा मेळावा पुढील आठवड्यात होणार असल्याची माहिती मिळत आहे. या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR