मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेला कोणाशीही युती करण्याच्या भानगडीत पडणार नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका मनसे २२५ ते २५० जागांवर स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. मनसे नेत्यांनी कल्याण-डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाचा प्रचारही केला. पण आगामी विधानसभा निवडणुका मनसे २२५ ते २५० जागांवर स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
२२५ ते २५० जागा लढवून ते कोणाला मदत करू इच्छितात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, ते मोदीजी किंवा अमित शहांना मदत करू इच्छितात जे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत, अशा शक्ती महाराष्ट्रात आहेत जे दाखवतात एक आणि करतात दुसरेच. ते त्यांच्या पक्षाचे मालक आहेत. पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आमची ही लढाई सुरूच राहील आणि जोपर्यंत महाराष्ट्रात आमची सत्ता येत नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील.
राऊत म्हणाले, लोक बोलतात एक आणि करतात दुसरेच. राज ठाकरे नुकतेच परदेशातून आले आहेत. ते बराच काळ परदेशात होते, त्यामुळे राज्यात काय चाललंय हे जाणून घ्यायला त्यांना वेळ लागेल. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बिन‘शर्ट’ पाठिंबा दिला. म्हणजे शर्ट काढून उघडा पाठिंबा दिला, असे उद्धवजींनी सांगितले होते.