लातूर : प्रतिनिधी
लातूर येथील खाडगाव रोड परिसरात असलेल्या रामरहीम नगरमध्ये एका घरात बाहेरगावच्या मुली-महिला आणून लातूर शहर व परिसरातील पुरूषांना बोलावून तिथे कुंटणखाना चालू असल्याचा भांडाफोड लातूरच्या अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने धाड टाकून केला असून या प्रकरणी तीघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खाडगाव रोड परिसरातील ग्यानदेव मंगल कार्यालयाच्या पाठीमागील परिसरात राहणा-या एका कुटुंबाने आपल्या एका सहका-यासह स्वत:च्या घरात लातूर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे, भिवंडी, खोपोली आदी शहरातून महिला व मुली आणून लातूर व परिसरातील पुरूषांना तिथे बोलावून स्वत:च्या फायद्यासाठी कुंटणखाना चालविला असल्याचे कळताच लातूर पोलीस अधीक्षक कार्यालया अंतर्गत असलेल्या अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजनेच्या सुमारास धाड टाकून पुजा पंढरी वलुरे, ज्ञानेश्वर पंढरी वलुरे व सचिन अशोक उबाळे या आरोपीतानी संगनमत करून स्वत:चे आधिक फायदयासाठी बाहेरून महिलांना घरी बोलावून घेवून त्यांना पैशाचे अमीष दाखवुन परिसरातील व शहरातील पुरुष ग्राहक यांना घरी बोलावून त्यांचेकडून वेश्या व्यवसाय करवून त्यातून मिळणारे पैशावर स्वत:ची उपजिपीका भागबीत असताना मिळून आले वगैरे अशी सुभाष शंकरराव सूर्यवंशी अनैतिक मानवी पाहतुक प्रतिबंध कक्ष, पोलीस अधिक्षकांच्या जबाबावरुन एमआयडीसी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला.