24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटला आयसीटीचे तीन पुरस्कार

रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटला आयसीटीचे तीन पुरस्कार

पुणे : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटने आयसीटी अकादमी, भारत सरकार, राज्य सरकार आणि इंडस्ट्री यांच्या वतीने आयोजित आयसीटी ब्रिज २०२४ पुरस्कार सोहळ्यात तीन पुरस्कार जिंकले. यात ‘मोस्ट एंगेज्ड इन्स्टिट्यूट ऑफ द इयर (इंजिनीअरिंग) २०२४’, ‘सर्वोत्कृष्ट समन्वयक २०२४’ पुरस्कार प्रा. निलेश सरदेशमुख यांना आणि ‘सायबर शिक्षा फॉर एज्युकेटर्स’ पुरस्कार यांचा समावेश आहे. नुकतेच हॉटेल हयात येथे झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात महाविद्यालयाचे सहाय्यक संचालक डॉ. वैभव हेंद्रे आणि डॉ. एन. बी. हुल्ले यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

दरम्यान रायसोनी कॉलेजला ‘शिक्षकांसाठी सायबर शिक्षा’ कार्यक्रमात सहभागासाठी मान्यता प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात आले. सायबर सुरक्षा शिक्षण वाढविण्याच्या उद्देशाने मायक्रोसॉफ्टने सायबर सुरक्षेच्या वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शिक्षकांना आवश्यक कौशल्य प्रदान करण्याचे उपक्रम राबविले आहेत.

रायसोनी कॉलेज पुणेचे संचालक डॉ. आर. डी. खराडकर, म्हणाले की, रायसोनी कॉलेजला ‘मोस्ट एंगेज्ड इन्स्टिट्यूट ऑफ द इयर (इंजिनीअरिंग) २०२४’हा पुरस्कार आणि इतर दोन पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी त्यांच्या इंडस्ट्री रेडी विद्यार्थी घडविण्याच्या योगदानासाठी हे पुरस्कार देण्यात आले आहेत. उद्योग भागीदारी वाढवणे, विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढवणे आणि नावीन्यपूर्ण शैक्षणिक पद्धतींना प्रोत्साहन देणे यासाठी संस्थेचे कार्य हे या पुरस्काराद्वारे प्रतिबिंबित होते.

रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष सुनील रायसोनी, रायसोनी एज्युकेशनचे कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी यांनी या यशाबद्दल संस्थेचे व सर्व कर्मचा-यांचे हार्दिक अभिनंदन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR