22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेले वक्तव्य सावंतांना भोवणार?

राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेले वक्तव्य सावंतांना भोवणार?

मुख्यमंत्र्यांनी भेटीचा निरोप धाडला

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादीसोबत आपले कधीच पटले नाही. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आले की उलट्या होतात, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याबाबतची वक्तव्यं केली. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता तानाजी सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावले असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केलेल्या महायुतीतील पक्षांमध्ये धुसफूस सुरू असल्याचे चित्र काल दिसून आले, शिवसेनेचे नेते आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

तानाजी सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावले असून तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मुंबईत बोलावल्याची माहिती समोर आली आहे. भेटीसाठी बोलावलेल्या तानाजी सावंतांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कान टोचणार का? अशी चर्चा आता समोर आली आहे. तानाजी सावंतांच्या वक्तव्यानंतर महायुतीतून बाहेर पडण्याबाबत अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांनी वक्तव्ये केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंतांना भेटीसाठी बोलावल्याने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर या भेटीत केलेल्या वक्तव्याबाबत शिंदे सावंतांचे कान टोचणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उमेश पाटलांची प्रतिक्रिया
तानाजी सावंत बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली आहे. महायुती झाली म्हणून सावंत मंत्री झाले, हे त्यांनी विसरू नये, असेही पाटील यांनी पुढे म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR