18.7 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeपरभणीराष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत परभणीच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत परभणीच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

परभणी : गुजरात राज्यातील सुरत येथे दि.२८ ते ३१ डिसेंबर दरम्यान झालेल्या राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत परभणीच्या खेळाडूंनी सुवर्ण व रौप्य पदक पटकावत परभणी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

सुरत येथे पार पडलेल्या या राष्ट्रीय जिम्नॅस्टीक स्पर्धेत संपूर्ण देशभरातून खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यात प्रज्वल बाळासाहेब आंबोरे व आदित्य नितीन खळीकर यांनी अनुक्रमे १४, १७ वयोगटात सुवर्णपदक पटकावले. तर पार्थ शिंदे व अभिषेक परमेश्वर शिंदे यांनी १४, १७ वयोगटात अनुक्रमे रोप्य पदक मिळवले. सीनियर गटात रमण संगीतम व साईदीप मठपलू यांनी कास्यंपदक व हर्षद जाठोडेने टीम चॅम्पियनशिप सुवर्णपदक जिंकले.

दिव्या आवाड, वैष्णवी राऊत यांनी आक्रोबाटिक जिम्नॅस्टिक राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. परभणीच्या सर्व खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सर्वांनाच थक्क करणारा अभुतपूर्व विजय मिळवून दिलेला आहे.

या विजयी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय कोच प्रदीप लटपटे, संदीप लटपटे व वेदांत मुंडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच परभणी जिल्ह्याचे जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव उत्तमराव लटपटे, महाराष्ट्राचे सचिव डॉ. मकरंद जोशी, डॉ. पवन भोईर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर या खेळाडूंना अ‍ॅड. नितीन खळीकर, अ‍ॅड. परमेश्वर शिंदे, राजू आव्हाड, बाळासाहेब आंबोरे यांनी प्रोत्साहन दिले. राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवून दमदार कामगिरी नोंदवत विजयी झालेल्या खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR