22.9 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeलातूररिअल ईस्टेट ब्रोकर असोसिएशनच्या अध्यक्षपदी घार तर सचिवपदी पवार बिनविरोध 

रिअल ईस्टेट ब्रोकर असोसिएशनच्या अध्यक्षपदी घार तर सचिवपदी पवार बिनविरोध 

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा रिअल ईस्टेट ब्रोकर असोसिएशनची नुतन कार्यकारणी ठरविण्यासाठी बैठक संस्थापक अध्यक्ष अनंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार (दि.२२) रोजी रुद्रेश्वर मंदिर सभागृहात पार पडली. सदरील बैठकीत अध्यक्षपदी अरुण विश्वनाथ घार, उपाध्यक्षपदी संजय रामचंद्र धुम्मा, सचिव पदी रामभाऊ शिवराम पवार, सह सचिव पदी मुबारक शेख तर कोषाध्यक्ष पदी विनोद देशमुख यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
घर, प्लॉट व फ्लॅट खरेदी विक्री करताना खरेदीदारांना योग्य मार्गदर्शन व माहिती मिळावी यासाठी लातूर जिल्हा रिअल ईस्टेट ब्रोकर असोसिएशनच्या माध्यमातून कार्य करण्यात येते. प्रामाणीकपणा व योग्य मार्गदर्शनामुळे घर, प्लॉट व फ्लॅट खरेदी करणा-यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या लातूर जिल्हा रिअल ईस्टेट ब्रोकर असोसिएशनची नुतन कार्यकारणी जाहिर करण्यात आली. सदरील कार्यकारणीत अध्यक्षपदी अरुण विश्वनाथ घार, उपाध्यक्ष पदी संजय रामचंद्र धुम्मा, सचिवपदी रामभाऊ शिवराम पवार तर सह सचिव पदी मुबारक शेख कोषाध्यक्ष पदी विनोद देशमुख यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
 नुतन कार्यकारणी मध्ये सदस्य व सभासद म्हणून ज्ञानेश्वर पाटील, शहाजी बनसोडे, अनंत गायकवाड, हनमंत फावडे, शामराव जमालपुरे, मोहनराव मोरे, डी. बी. भोसले, महादेव गायकवाड, रविंद्र महाजन, संजय बिराजदार, मुबारक शेख, आप्पाराव माचवे, संदिपान कदम, चंद्रकांत दंडगुले, धर्मराज पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. लातूर जिल्हा रिअल ईस्टेट ब्रोकर असोसिएशनच्या कार्यकारणीतील सर्व नवनियुक्त पदाधिकारी सदस्यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष अनंत गायकवाड यांच्या हस्ते करुन पुढील कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR