24.3 C
Latur
Tuesday, June 25, 2024
Homeलातूररितेश देशमुख, जेनेलिया देशमुख यांच्या हस्ते आज पारितोषिक वितरण सोहळा

रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख यांच्या हस्ते आज पारितोषिक वितरण सोहळा

लातूर  :  प्रतिनिधी
लातूर जिल्हा व परिसरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप  ग्रामीण टी १० चा पारितोषिक वितरण सोहळा सिनेअभिनेते रितेश देशमुख, प्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्या हस्ते आज (दि.२५) रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे सायंकाळी पार पडणार आहे. त्यांच्या उपस्थितीतच स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे.
ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप  ग्रामीण टी १० ही स्पर्धा सुरू करण्यात आली असून या स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. शनिवारी (दि.१८) या स्पर्धेला सुरुवात झाली  होती.  लातूर शहर जिल्ह्यातील सर्व तालुके व लोहा-कंधार (जि. नांदेड) मधील सुमारे ३०० पेक्षा अधिक संघ सहभागी झाले होते. लातूर तालुक्यातील ४२, लातूर शहर ३२, उदगीर ४१, अहमदपूर १५, चाकूर २२, देवणी २०, जळकोट १८, रेणापूर २३, शिरुर अनंतपाळ २६, औसा ३२, निलंगा १४ तर लोहा – कंधार तालुक्यातील १३ असे संघ व पाच हजारांपेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते.
तालुक्यात प्रथम आलेल्या १२ संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली. या जिल्हास्तरीय स्पर्धा गेल्या दोन दिवसापासून जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरू आहेत. उपांत्य फेरीत रेणापूर विरुद्ध उदगीर आणि अहमदपूर विरुद्ध लातूर शहर यांच्यात लढत होऊन या स्पर्धेचा अंतिम सामना आज (दि.२५) रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे. यावेळी अभिनेते रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख उपस्थित राहणार आहेत. या सामन्यास अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR