27.3 C
Latur
Sunday, November 10, 2024
Homeपरभणीरिमोट कंट्रोल बोटीच्या माध्यमातून गणपतीचे विसर्जन

रिमोट कंट्रोल बोटीच्या माध्यमातून गणपतीचे विसर्जन

सेलू : शहरातील प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यंदा गणेश विसर्जनाच्या अनोख्या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रिमोट कंट्रोल बोटीच्या सहाय्याने गणपतीचे विसर्जन करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक उत्सवाला एक नवीन दिशा दिली आहे.

डॉ. संजय रोडगे यांच्या मार्गदर्शनातून वर्ग ९वीतील विद्यार्थी प्रणव मुजमुले याने हा प्रयोग शाळेतील रोबोटीक लॅबमध्ये तयार केला. या रिमोट कंट्रोल बोटीद्वारे श्री गणेशाची मूर्ती दूधना नदीमध्ये नेण्यात आली व नंतर रिमोटच्या सह्यायाने विसर्जन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून समाजात सकारात्मक संदेश पसरला आहे.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. रोडगे यावेळी म्हणाले, विद्यार्थ्यांनी केलेली ही कल्पकता आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हा कौतुकास्पद आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भविष्यातही असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील असा आशावाद व्यक्त केला. यावेळी मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला, विज्ञान विभाग प्रमुख नारायण चौरे, राजेंद्र देशमुख, अर्जुन गरुड, अनिल नागरे, बालाजी बामणे, कपिल ठाकूर, शुभम पवार, श्रीकृष्ण खरात, सुरज शिंदे तसेच अनेक विद्यार्थी, पालक या उपक्रमात सहभागी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR