रेणापूर : प्रतिनिधी
रेणा साखर कारखाना (ता. रेणापूर) येथे गळीत हंगाम २०२४-२०२५ साठी माजी तथा
सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते मील रोलर पुजन करण्यात आले.
यावेळी रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, माजी आमदार तथा संचालक त्र्यंबक भिसे, राज्य साखर संघाचे सदस्य तथा संचालक आबासाहेब पाटील, रेणा कारखान्याचे माजी चेअरमन तथा संचालक यशवंतराव पाटील,जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, ट्वेन्टीवन कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, श्री संत मारोती महाराज कारखान्याचे चेअरमन शाम भोसले, रेणाचे कार्यकारी संचालक बी.व्ही.मोरे, मांजरा कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडित देसाई, विलास कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई, संत शिरोमणीचे कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे, जागृती शुगरचे प्रकल्प व्यवस्थापक गणेश येवले, मांजरा शुगर इंडस्ट्रीजचे जनरल मॅनेजर सतिश वाकडे, संचालक धनराज देशमुख, संजय हरिदास, प्रेमनाथ आकणगिरे, संग्राम माटेकर, प्रविण पाटील, संभाजी रेड्डी, शहाजीराव हाके, तानाजी कांबळे लालासाहेब चव्हाण, अनील कुटवाड, संचालीका सौ.वौशालीताई माने, सौ.अमृताताई देशमुख, स्रेहलराव देशमुख, सतीश पाटील जिल्हा बँकेचे माजी संचालक संभाजी सुळ, सतीश पाटील वडगांवकर, कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी एस.एस. भोसले, डिस्टलरी इंन्चार्ज डी.बी.देशमुख, चिफ केमीस्ट पी.बी.केदार, चिफ इंजिनिअर पी.एम. चव्हाण, चिफ अकौंटंट एम.एस.ंिनंबाळकर पर्यावरण अधिकारी व्ही.ए.वडवले यांच्यासह
अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.