20.5 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeलातूररेणा साखर कारखान्यास सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता आर्थिक व्यवस्थापन प्रथम पुरस्कार जाहीर

रेणा साखर कारखान्यास सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता आर्थिक व्यवस्थापन प्रथम पुरस्कार जाहीर

रेणापूर : प्रतिनीधी
रेणापूर तालुक्यातील रेणा सहकारी साखर कारखाना हा राज्याचे माजी मंत्री तथा कारखान्याचे संस्थापक सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. अमित विलासराव देशमुख व लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या कुशल मार्गदर्शन व नियोजनाने वाटचाल करत साखर कारखानदारीत विविध विक्रम करुन राज्यातील सर्व साखर कारखान्यापुढे रेणा कारखान्याने एक आदर्श निर्माण केला असुन कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये मिल मधील उसाचा तंतूमय निर्देशांक, रिडयुस्ट मिल एक्स्ट्रॅक्शन, साखर तयार करण्यासाठी लागणा-या वाफेचा, विजेचा, बगॅस वापर गाळप क्षमतेमध्ये वाढ, गाळप क्षमतेचा वापर तसेच देखभाल दुरुस्तीसाठीचा खर्च इत्यादिचा

तसेच साखरेचा प्रति क्विंटल रोखीचा उत्पादन प्रक्रीया खर्च व एकुण उत्पादन प्रक्रीया खर्च हा राज्याच्या सरासरी साखरेच्या उत्पादन प्रक्रीयापेक्षा कमी असल्याने, खेळत्या भाडवंलावरील व्याजाचा खर्च राज्याच्या सरासरी खेळत्या भाडवंलावरील व्याजाच्या खर्चापेक्षा कमी व इतर कारखान्याच्या तुलनेत इन्व्हेंटरी व्यवस्थापन सर्वोत्कृष्ठ आहे. यासह इतर निकष पाहता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे संस्थेच्या वतीने दिले जाणारे गळीत हंगाम २०२२-२३ या सालातील सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता व उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन प्रथम पुरस्कार जाहीर झाले असून सदरील पुरस्कार हा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे संस्थेच्या दि. ११ जानेवारी रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

तसेच रेणा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत केलेला कै. विलासराव देशमुख सर्वोत्कष्ट उद्योजकता पुरस्कार सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप हे मानचिन्ह प्रशस्तीपत्र व रक्कम रुपये एक लाख रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. कारखान्याने यापुर्वी राष्ट्रीय साखर महासंघ दिल्ली यांचेमार्फत देण्यात येणारे देश पातळीवर व वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट, पुणे यांचे मार्फत देण्यात येणारे तसेच राज्यस्तरीय महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना पुरस्कार व राज्यशासनाचा सहकारनिष्ठ पुरस्कारसह विविध १४ पुरस्कार कारखान्याने मिळवलेले आहेत. रेणा साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे यासंस्थेच्या वतीने गळीत हंगाम २०२२-२३ या सालातील सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता व उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन प्रथम पुरस्कार मिळाल्याबददल कारखान्याचे संस्थापक दिलीपरावजी देशमुख, आमदार धिरज विलासरावजी देशमुख साहेब, चेअरमन सर्जेराव मोरे व्हा.चेअरमन, अनंतराव देशमुख कार्यकारी संचालक बी.व्ही.मोरे तसेच संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी यांचे कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांकडुन अभिनंदन होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR