30.8 C
Latur
Saturday, May 25, 2024
Homeक्रीडालखनौला दणका, दिल्लीचा विजय

लखनौला दणका, दिल्लीचा विजय

लखनौ : इंडियन प्रीमियर लीग- आयपीएलच्या १७ व्या सीजनमध्ये २६ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंटस्चा सहा विकेट्सने पराभव केला. लखनौ येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या या सामन्यात दिल्लीला विजयासाठी १६८ धावांचे लक्ष्य होते, ते संघाने १८.१ षटकात पूर्ण केले. आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्सवर दिल्ली कॅपिटल्सचा हा पहिला विजय आहे.

यापूर्वी दिल्लीचा लखनौविरुद्ध सलग तीन सामन्यात पराभव झाला होता. त्याशिवाय लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध १६० किंवा त्याहून अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणारा दिल्ली हा पहिला संघ ठरला आहे. जेक फ्रेझर-मॅकगर्क दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा हिरो ठरला. जेकने आपला पहिला आयपीएल सामना खेळताना ३५ चेंडूत ५५ धावांची खेळी खेळली, ज्यात पाच षटकार आणि दोन चौकार मारले. जेक आणि कर्णधार ऋषभ पंत यांच्यात तिस-या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी झाली, त्यामुळे लखनौचा विजय जवळपास ठरला होता. पंतने २४ चेंडूंत ४ चौकार आणि दोन षटकारांसह ४१ धावा केल्या. पृथ्वी शॉनेही ३२ धावांची खेळी खेळली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR