मुंबई : प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. नवी मुंबईतील चार्टर्ड अकाऊंट यांनी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या कोर्टात यासंबंधीची याचिका सादर केली आहे. या याचिकेत लाडकी बहीण योजना का? हा तर करदात्यांच्या पैशांचा अपव्यव आहे असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेविरोधातील या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास, तसेच लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यावेळी याचिकेवर सुनावणीस एवढी घाई का? असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयाने याचिकाकर्त्याची विनंती मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला.
लाडकी बहीण योजना का? हा तर करदात्यांच्या पैशाचा अपव्यय असून या योजनेमुळे तिजोरीवर मोठा भार पडत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला होता. तसेच १४ ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणा-या योजनेच्या पहिल्या हप्त्यावर तात्काळ स्थिगितीची मागणी देखील या याचिकेत करण्यात आली होती. आता सदर याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी होणार आहे.