22.9 C
Latur
Friday, July 26, 2024
Homeलातूरलातूर एज्युकेशन सोसायटी अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे  

लातूर एज्युकेशन सोसायटी अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे  

लातूर : प्रतिनिधी
लातूर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष पदी लातूरचे माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांची निवड करण्यात आली. स्व. मनोहरराव गोमारे यांच्या निधनामुळे रिक्त्त झालेल्या जागी निवड करण्याकरिता आयोजित सर्व साधारण सभेत संस्थेच्या सदस्यांनी बहुमताने अध्यक्ष पदी विक्रम गोजमगुंडे यांची निवड केली.
लातूर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने शहरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक परिसरात ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच जवाहर प्राथमिक विद्यालय आणि जगळपूर येथील संत तुकाराम विद्यालय चालविले जाते. यात सुमारे २५०० पेक्षा अधिक आणि प्रामुख्याने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. लातूर येथील ख्यातनाम समाजवादी नेते स्व. मनोहरराव गोमारे यांच्या निधनामुळे लातूर एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष पद रिक्त्त झाल्याने संस्थेच्या बाळकृष्ण बलदवा सभागृहात विशेष सर्व साधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खेळी मेळीच्या वातावरणात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत संस्थेच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला आणि बहुमताने अध्यक्ष पदी विक्रम गोजमगुंडे यांची निवड केली. निवडीनंतर नूतन अध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांनी स्व. मनोहरराव गोमारे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन सर्व सदस्यांचे आभार व्यक्त्त केले.
यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष विक्रम गोजमगुंडे म्हणाले की, पुढील काळात स्व. मनोहरराव गोमारे यांच्या विचाराने प्रेरित या संस्थेची अधिक भरभराट करण्यासाठी आपण कटिबध्द राहू तसेच सर्व संचालक मंडळ आणि संस्थेचे सदस्य यांना विश्वासात घेवूनच संस्थेची पुढील वाटचाल करणार असून सदस्यांच्या विश्वासाला तडा जाईल, असे काम आपल्या हातून घडणार नाही याची ग्वाही देत यामध्ये समाजातील सर्व घटकांना  सामावून घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. संस्थे अतंर्गत चालणा-या सर्व विद्यालययांच्या शैक्षणिक प्रगती सोबत क्रीडा आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी सर्वांनी योगदान देण्याचेही आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी संस्थचे उपाध्यक्ष प्रल्हादराव दुडीले, सचिव डी. एन. शेळके, कार्यकारिणी सदस्य भारत साबदे, प्रकाश शिंगडे, डॉ. सोपानराव जटाळ, नाथराव कोले, विठ्ठलराव इगे, नागनाथ कनामे, विनायक पिनाटे, हरिश्चंद्र येरमे, माधवराव गोलावार, अनिरुद्ध शेळके यांच्यासह अ‍ॅड. संतराम चेवले, डी. जी. शेळके, व्यंकटराव कलमुकले, दिलीप कोले, सूर्यकांत किटेकर, मनोहर भोपे, अ‍ॅड. पंडितराव उगीले, रघुनाथ सुडे, सूर्यकांत रेड्डी, भागवत  इरालपल्ले, भारत चामले, मदनराव खंदाडे, आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. पी. टी. ढगे यांनी निवडीनंतर रीतसर प्रमाणपत्र देवून अध्यक्ष पदी विक्रम गोजमगुंडे यांची निवड झाल्याचे घोषित केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR