25.3 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeलातूरलातूर पोलिसांची गुटखा कारखान्यावर धाड

लातूर पोलिसांची गुटखा कारखान्यावर धाड

लातूर : प्रतिनिधी
लातूर पोलिसांकडून पुन्हा एकदा एमआयडीसी परिसरात गुटखा बनविणा-या कारखान्यावर धाड टाकून ४४ लाखापेक्षा जास्त मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  मागील आठवड्यात अतिरिक्त एमआयडीसी परिसरात लातूर पोलिसांकडून गुटखा बनविणा-या कारखान्यावर धाड टाकून ३ कोटी रुपया पेक्षा जास्त किमतीचा गुटखा व गुटखा बनविण्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तर एमआयडीसी पोलिसांना गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारे लातूर अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील राहुल कोल्ड्रिंक्स, प्लॉट नंबर १४८ या गोडाऊन वर दिनांक ०७ जून २०२४ रोजी छापा टाकला असता शासन प्रतिबंधित गुटखा व गुटखा तयार करण्याचे साहित्य असे ४४ लाख २२ हजार ७६८  रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
  सदर प्रकरणी यातील आरोपी विजय केंद्रे, जयपाल जाधव, बाळासाहेब वाघमारे, मल्हारी मजगे आणि अर्जुन केदार यांचे विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. सदर प्रकरणी सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक, लातूर, अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक, लातूर, भागवत फुंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी, लातूर शहर यांचे मार्गदर्शनात एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस. डी. नरवाडे, पोलीस उपनिरीक्षक कराड, सहाय्यक फौजदार जगताप, पोलीस हवालदार पिस्तुलकर, पोलीस हवालदार देशमुख, पोलीस नाईक भोसले, गाडे पोलीस अंमलदार दळवे व चालक पोलीस अंमलदार जाधव यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR