29.3 C
Latur
Sunday, April 21, 2024
Homeलातूरलातूर येथे मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचे लोकार्पण

लातूर येथे मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचे लोकार्पण

लातूर : प्रतिनिधी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचे लोकार्पण दि. १२ मार्च रोजी झाले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थिती होती.
लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच कारखानास्थळी आयोजित कार्यक्रमाला खासदार सुधाकर शृंगारे, आमार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, सहायक जिल्हाधिकार नमन गोयल, रेल्वेचे मुख्य कारखाना अभियंता सुबोधकुमार सागर, माजी आमदार सुधाकर भालेराव, देविदास काळे, दिलीप देशमुख, गणेश हाके, सोलापूर रेल्वे विभागाचे सहायक व्यवस्थापक शैलेंद्रंिसह परिहार यांची उपस्थिती होती. मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यामुळे लातूरच्या विकासात भर पडणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात विविध विकास कामे सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून लातूर येथे मराठवाडा रेल्वे कोच कारखाना उभारण्यात आला. या कारखान्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष स्वरुपात रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच कारखान्यासाठी आवश्यक छोटे-छोटे उद्योगही येथे उभे राहतील, असे खासदार सुधाकर शृंगारे यांनी सांगितले. यावेळी आमदार संभाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
या कारखान्यात १२० वंदे भारत रेल्वे तयार केल्या जाणार आहे.  मराठवाडा रेल्वे कोच कारखाना हा लातूरसाठी प्रगतीचे दालन उपलब्ध करुन देणारा विकासमार्फत ठरणार आहे. या कारखान्यामुळे मराठवाड्यातील युवा वर्गाला रोजगाराची संधी निर्माण होतील, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यावेळी म्हणाल्या. प्रारंभी रेल्वेचे मुख्य कारखाना अभियंता सुबोधकुमार सागर यांनी मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याबाबत सविस्तर माहिती दिली. रेल्वे मंत्रालयाच्या मालकी असलेला या कारखान्यासाठी सुमारे ३५० एकत्र जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून याठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रेल्वे कोच निर्मिती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR